नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अवैध दारूच्या वापरावर निर्बंध लादण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. उमरी खदान येथे हातभट्टी निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकत १ लाख ७२ हजार रुपयांचा माल नष्ट केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील उमरी खदान येथे हातभट्टी दारूनिर्मितीच्या कारखान्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत ६,९०० लिटर मोहा सडवा, २०० लिटर मोहा तयार दारू, २०० लिटर क्षमतेचे २५ भट्टी ब्यारेल्स व २०० लिटर क्षमतेची रसायन भरलेली २० ब्यारेल्स, १००० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाकी मध्ये सडवा तसेच २५ लोखंडी व ३० प्लास्टिक ड्रम्स, १५ चाटू व १८ जर्मन पातेली असा १ लाख ७२ हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष हनवते यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे, बाळासाहेब भगत, रवींद्र सोनोने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, जवान संजय राठोड, समीर सय्यद, सुधीर मानकर, वाहन चालक देवेश कोटे तसेच ३० होमगार्ड्स सहभागी झाले होते.
अधिक वाचा : सिलिंडरचा भडका