‘लाव रे तो व्हिडिओ’; राज यांच्या ‘पंच’ची चर्चा

Date:

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ पेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या राज यांनी प्रचारसभांमध्ये व्हिडिओ दाखवत ‘पोल खोल अभियान’ छेडले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्ये आणि दिलेली आश्वासने कशी फोल आहेत हे राज ठाकरे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सभांमध्ये दाखवत आहेत. राज यांच्या सभेनंतर ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्याला मोठी लोकप्रियता मिळताना दिसत आहे.

आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज यांनी जाहीर केले आहे. मात्र, आपण पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत राज्यात प्रचारसभा आयोजित केल्या. सभेदरम्यान राज मोठ्या पडद्यावर व्हिडिओ दाखवायला सांगतात, आणि त्यावेळी ते ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी सूचना करताना दिसतात.

राज यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य नेटकऱ्यांनी उचलून धरले असून त्या संदर्भातील असंख्य पोस्ट पाहायला मिळत आहेत. राज यांचे हे वाक्य अतिशय आवडल्याचे काही नेटकरी म्हणतात, तर राज यांच्या प्रचाराची ‘हटके’ स्टाइल आपल्याला भावल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा : लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related