लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा चीननं केला विरोध

Ladakh
Ladakh

नागपूर: लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचा चीननं विरोध केला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळणे अमान्य असल्याचे चीनने म्हटले आहे.

दोन्ही देशांमधील जैसे थे स्थिती एकपक्षीय पद्धतीने बदलणारी तसेच दोन्ही देशांमधील तणाव वाढवणारी पावले उचलू नयेत असं आवाहन चीनने केलं. मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असं प्रत्युत्तर चीनला दिलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ ही भारताची अंतर्गत बाब आहे. भारत अन्य देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर टिप्पणी करत नाही आणि हीच अपेक्षा अन्य देशांकडूनही व्यक्त करतो.’

चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही. लडाखबद्दल चीनने हे विधान केले आहे. त्यावर भारताने वरील प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा :   सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास प्रवास : वकील ते केंद्रीय मंत्री