काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याची केंद्राची शिफारस

Jammu & Kashmir
Jammu & Kashmir

नागपूर : काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

काश्मीरमधील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

>> अमित शहा यांनी काश्मीरातील कलम ३७० रद्द करणारं विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा प्रचंड गोंधळ

>> काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याची केंद्राची शिफारस; विधेयक अमित शहा यांनी राज्यसभेत मांडलं

>> काश्मीरमध्ये सध्या कर्फ्यू परिस्थिती, तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैद केलंय; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय यावर चर्चा झालीच पाहिजे; गुलाम नबी आझाद यांची माहिती

>> राज्यसभेत केंद्रीय अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात, विरोधकांचा गोंधळ

>> लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा जसलमेर दौरा रद्द

>> काश्मीरप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ११ वाजता संसदेत निवेदन करणार

>> जम्मू आणि काश्मीरसाठी रेल्वेचं तिकीटं काढलेल्या प्रवाशांचे तिकीटाचे पैसे रेल्वे परत करणार

>> नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडाळाच्या बैठकीला सुरुवात, काश्मीरप्रश्नी मोठा निर्णय होण्याची शक्यता

>> काश्मीरात मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या; काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची टीका

>> संसदेचं आजचं कामकाज सुरु होताच काश्मीरप्रश्नी चर्चा घेण्याची काँग्रेसची मागणी

>> अमित शहा यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले

>> जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे काश्मीरमधील परिस्थितीचे प्रत्येक तासाला अपडेट्स देण्याचे मुख्य सचिवांना आदेश

>> केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले

>> काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केल्याचा व्यक्त केला निषेध.

>> काश्मीरमधील लँडलाइन फोन सेवाही बंद

>> जम्मू-काश्मिरात सकाळी ६ वाजल्यापासून सुरक्षा व्यवस्थेत वाढ, सकाळी ९.३० वाजता होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

>> काश्मिरात केबल टीव्ही नेटवर्क प्रसारण रोखले

>> जम्मू: किश्तवाढ जिल्ह्यात हाय अॅलर्ट

>> आज वाजपेयी असायला हवे होते: मेहबुबा मुफ्ती

>> काश्मीरपाठोपाठ जम्मूमध्येही सकाळी सहापासून कलम १४४ लागू होणार

>> जम्मू विद्यापीठ सोमवारपासून बंद राहणार

>ओमर अब्दुल्लांनी केलं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन

>> ज्या भारतात काश्मीर विलीन झालं तो हा भारत नाही: ओमर अब्दुल्ला

>> जम्मूमधील उधमपूर जिल्ह्यात कलम १४४ लागू

>> रियासी जिल्ह्यात कलम १४४ लागू

>> श्रीनगर शहर व जिल्ह्यात सीआरपीसीचे कलम १४४ लागू

>> जम्मू-काश्मीरमधील सर्व सरकारी, खाजगी शाळा महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी

>> काश्मीरमधील मोबाइल नेटवर्क ठप्प, इंटरनेट सेवा बंद

>> पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती स्थानबद्ध

> नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला स्थानबद्ध