स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करायचंय? तर, ही बातमी तुमच्यासाठी…

SBI

मुंबई : भारतीय स्टेट बँकेमध्ये काम करणार आहात, तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांतील बॅंकेच्या शाखांमध्ये अप्रेंटिस पदावर काम करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे एकूण ६१०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बॅंकमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅंकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उमेदवार या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतो. एसबीआय अप्रेंटिसशिपची प्रक्रिया ६ जुलैपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याती अंतिम तारीख २६ जुलै अशी आहे.

शैक्षणिक पात्रता : एसबीआयमध्ये ६१०० अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२१ ला २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. एसबीआयने आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार नोटिफिकेशन वाचू शकतात.

निवड प्रक्रिया आणि स्टायपेंड : एसबीआयमध्ये अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ऑनलाइन लेखी परीक्षेमध्ये जनरल/फायनांशिअल अवेअरनेस, जनरल इंग्रजी, क्वांटीटेटीव्ह एप्टीट्यूड आणि रिजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्यूटर एप्टीट्यूड विषयांचे एकूण १०० प्रश्न असतील.परीक्षा १ तासाांची असेल आणि एकूण शंभर मार्कांची असेल. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी निमंत्रित केले जाणार आहे. अंतिम निवड झाल्यानंतर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना सुरुवातीस १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्यात येणार आहे.