श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक इंदिरा आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन

Date:

• भारतातील सर्वात मोठी प्रजनन उपचार केंद्र साखळी असणाऱ्या इंदिरा आयव्हीएफ चे नागपूरमध्ये आपले नवीन तंत्रज्ञानप्रणीत केंद्

नागपूर: भारतातील सर्वात मोठी प्रजनन उपचार केंद्र साखळी असणाऱ्या इंदिरा आयव्हीएफ ने महाराष्ट्रातील नागपूरमधील इच्छुक पालकांसाठी आपले नवीन तंत्रज्ञानप्रणीत केंद्र सुरु केले आहे. भारत सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय श्री नितीन गडकरी यांनी इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ.अजय मुर्डिया यांच्या समवेत या केंदाचे उद्घाटन केले. याप्रसंगी इंदिरा आयव्हीएफचे संचालक आणि सह-संस्थापक श्री नितिज मुर्डिया आणि नागपूर मधील इंदिरा आयव्हीएफच्या टीम समवेत डॉ.मयुरी अस्सुदानी हेही उपस्थित होते.

ही संस्था त्यांनी मिळविलेल्या उच्च यशासाठी आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. संस्थेतर्फे दरवर्षी ३३००० हून अधिक भ्रूणरोपण केले जाते आणि त्यामुळे हे देशातील सर्वोत्तम प्रजनन क्लिनिक्स पैकी एक बनले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अकोला आणि सोलापूर यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये संस्थेची केंद्र असून या सर्व केंद्रांनी मिळून ६००० हून अधिक जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम केले आहे.

इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ.अजय मुर्डिया याप्रसंगी बोलताना म्हणाले, “आजवर ९७००० जोडप्यांना यशस्वी आयव्हीएफच्या माध्यमातून मदत करून आम्ही इथवरचा प्रवास केला आहे हे बघून मला आणि माझ्या टीमला अतीव समाधान मिळत आहे. वंध्यत्वाबद्दलच्या भ्रामक कल्पना दूर करणे आणि त्यासंदर्भातील वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती करणे याबद्दलचे आमचे प्रयत्न अखंड सुरूच आहेत. आणखी जोडप्यांना त्यांचे कुटुंब वाढविण्यासाठी मदत करण्याकरता नागपूरमध्ये आमचे केंद्र सुरु करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.”

Nitin Gadkari

भारतात गर्भधारणा उपचारांसंदर्भातील जाणीव खूप मर्यादित आहे आणि बहुतांशवेळेला स्त्रियांना त्या गर्भधारणा करू शकत नसतील तर भेदभाव सहन करावा लागतो. सहा पैकी एका जोडप्याला मूल होण्यात अडचणी येतात आणि हे समजून घेणे गरजेचे आहे की स्त्री, पुरुष किंवा दोघांमधील शारीरिक स्थितीमुळे असे होऊ शकते. सहाय्यभूत ठरणारे प्रजनन तंत्रज्ञान स्त्री आणि पुरुष दोघांसाठी योग्य सुविधा प्रदान करते, पालकत्वाच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना आवश्यक असलेले पाठबळ देते. इंदिरा आयव्हीएफ वापरत असलेल्या अत्याधुनिक, अद्ययावत तंत्रज्ञान कुशलतेमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यासाठी त्यांच्या उपचारांच्या पहिल्या प्रयत्नांतच यश मिळाले आहे.

या उद्घाटन प्रसंगी इंदिरा आयव्हीएफ नागपूरच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. मयुरी अस्सुदानी म्हणाल्या, “२०१६ मध्ये जेव्हा आम्ही नागपूरमध्ये आमच्या कामाला सुरुवात केली तेव्हा अनेकांना आमच्या क्लिनिकमध्ये पाऊल ठेवतानाही अवघडायला व्हायचं याचा अनुभव आम्ही घेतला आहे. वंध्यत्वाकडे कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन आणि जाणीवजागृतीचा अभाव ही त्यामागील मुख्य कारणे असल्याचे दिसून आले. मग आम्ही विपणन उपक्रम राबवून जोडप्यांचे प्रबोधन केले, योग्य माहिती पुरवली. वंध्यत्व आणि मासिक पाळीच्या वेळी घ्यायची स्वच्छता आणि आरोग्य जपणे याविषयी जनजागृती अभियान केले. यामुळे वंध्यत्व ही एक वैद्यकीय समस्या आहे याची जाणीव जोडप्यांना व्हायला मदत झाली. इंदिरा आयव्हीएफ नागपूर मधील आमची आयव्हीएफ तज्ञांची टीम प्रत्येक इच्छुक पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे.”

अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने इंदिरा आयव्हीएफने अगणित जोडप्यांना त्यांच्या बऱ्याचदा गुंतागुंतीच्या ठरलेल्या वंध्यत्वाच्या समस्येच्या प्रवासात दिशादर्शन केले आहे आणि अखेरीस आपले कुटुंब साकारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला मदत केली आहे. त्याचवेळी केंद्रातर्फे सल्ला-मार्गदर्शनही केले जाते. अनेक जोडप्यांना त्यांच्या चाळीशीच्या आसपास कुटुंब वाढवायचे असते. तोवर कुटुंब नियोजन करण्याचा पर्याय त्यांनी निवडलेला असतो. अशा तरुण स्त्री-पुरुषांसाठी त्यांचे स्त्रीबीज आणि शुक्राणू जतन करून ठेवण्याच्या सुविधाही केंद्रातर्फे पुरविल्या जातात.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...