नागपूर : स्वच्छ नागपूरच्या दिशेने नागपूर शहराने वाटचाल केली आहे. रस्त्यावर आता कुठेही कचरा टाकता येणार नाही, यासाठी नागपूर महानगरपालिकेने आधुनिक हायड्रोलिक कचरा टबाची निर्मिती केली आहे. हा कचरा टब गांधीबाग उद्यानाजवळील कचरा घराजवळ सुरू करण्यात आला.
हायड्रोलिक कचरा टबाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.३१) उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अभिजित बांगर आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका विद्या कन्हेरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, झोन सहायक आयुक्त अशोक पाटील, झोनल अधिकारी सुरेश खरे, उपअभियंता रवींद्र बुंदाडे, सुरेंद्र दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरात सर्वत्र रस्त्यावर कचरा जमा केला जात आहे. यामुळे त्या भागात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असते. शहराचे विद्रुपीकरणही होत असते. यामुळे या कचरा टबाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने या प्रभागात शहरातील पहिला अत्याधुनिक हायड्रोलिक कचरा टब तयार करण्यात आला आहे. दयाशंकर तिवारी यांनी स्थायी समितीच्या निधीतून या कचरा टबची निर्मिती केली आहे. हा परिसर व्यापारिक असल्यामुळे सफाई कर्मचारी कचरा संकलन करून एका ठिकाणी एकत्र करीत होते. त्या ठिकाणी रस्त्यावर कचरा दिसत होता. आता हायड्रोलिक टबच्या उदघाटन झाल्यामुळे या टबमध्ये जवळपास ५० क्युबिक मीटर कचरा अर्थात् १० गाड़ी कचरा एका वेळी संकलित करता येईल. म्हणून आता त्या ठिकाणी रस्त्यावर कचरा राहणार नाही. कचरा मोठ्या टबमध्ये हायड्रोलिक लिफ्टच्या साहाय्याने त्या टबमध्ये टाकला जाणार आहे.
यावेळी बोलताना आयुक्तांनी या अभिनव संकल्पनेची प्रशंसा केली आहे. याचे देखभाल व दुरूस्ती नियमित करण्यात यावी. दररोज कचरा हा उचलला गेला पाहिजे, अशी सूचनाही झोनल अधिकाऱ्यांना केली. महिन्यातून किमान एकदा या टबला रंगरंगोटीही करावी, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. स्वच्छ नागपूर संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ही संकल्पना उपयोगाची आहे. शहरात अन्य ठिकाणीही अशा प्रकारच्या कचरा टबचे निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी अशोक नायक, अविनाश शाहू, राजेश कन्हेरे, बृजभूषण शुक्ला, राजेश गौर, अशोक शुक्ला, कमलेश नायक, मनोज प्रजापती, अमोल कोल्हे, गुड्डू जयस्वाल, सतीश बगले, विनय भाके, जयंत मोटघरे , विशाल गौर, सविता उमाठे, मालती बढिये, विजय सारडा उपस्थित होते.
अधिक वाचा : हॅकॉथॉनसाठी १५०० जणांचा ऑनलाईन प्रवेश