नागपूर – गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने तरुणीला चिरडले; मुलगा जखमी

Date:

नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने वीसवर्षीय तरुणीला चिरडून ठार केले. या घटनेत सतरावर्षीय मुलगाही जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

मयूरी झोडापे असे मृताचे तर शुभम डोंगरे (दोन्ही रा. फेटरी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुभम व मयूरी गुरुवारी हॉस्पिटलमध्ये आले होते. दुपारी मोपेडने (एमएच-३१-डीई-१४८१) नागपूरहून फेटरी येथे जात होते. मोपेड शुभम चालवित होता. गोरेवाडा भागात मागाहून ट्रक (एमएच-३१-सीबी- ५९३७) येत होता. ट्रकला समोर जाऊ देण्यासाठी शुभमने मोपेड बाजूला घेतली. याचदरम्यान रस्त्याच्या काठावरून मोपेडचे चाक खाली आले. दोघेही मोपेडवरून खाली पडले. मागाहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली मयूरी चिरडली गेली. शुभम डाव्या बाजूला पडल्याने जखमी झाला.

माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून मयूरीचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. शुभमला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. शुभमकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, असे कळते.

अधिक वाचा : नागपूर : ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...