नागपूर : अापल्या मुलास स्वीय सचिव असल्याचे दाखवून अमेरिकेच्या दौऱ्यात सोबत नेणाऱ्या नागपूरमधील भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांच्यावर टीका हाेत अाहे. मात्र ‘संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेऊ’, अशा शब्दांत त्यांनी अापल्या निर्णयाचे समर्थन करत उद्दामपणाचे दर्शन घडवले आहे.
काँग्रेसने महापौराविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेची नोटीसही दिली. मात्र, सोमवारीच्या सर्वसाधारण सभेत हा विषयच आला नाही. उलट काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या वर्तनाबद्धल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव सभेत मंजूर झाला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने महापौरांच्या वर्तनाबद्धल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे निवेदन महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.
अधिक वाचा : देश आणि पक्षाच्या हितासाठी सरकारने राफेल प्रकरणातील सत्य सर्व देशाला सांगावे : शत्रुघ्न सिन्हा