देश आणि पक्षाच्या हितासाठी सरकारने राफेल प्रकरणातील सत्य सर्व देशाला सांगावे : शत्रुघ्न सिन्हा

shatrugna_sinha_katol
नागपुर : सध्या देशात विरोधी पक्षा कडून सरकारला राफेल प्रकरणा  करता चांगलेच घेरले असून या बाबत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वपक्षावरच अविश्वास दर्शवला आहे. या प्रकरणात काही चूक झाली असेल तर ते मान्य करायला सरकारने घाबरू नये, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. देश आणि पक्षाच्या हितासाठी सरकारने राफेल प्रकरणातील सत्य सर्व देशाला सांगायला पाहीजे. सरकारच्या धोरणामुळे नाराज असलेले आमदार आशिष देशमुख यांच्यावतीने जिल्ह्यातील काटोल येथे युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर सिन्हा माध्यमांशी बोलत होते.
फ्रान्सचे माजी राष्ट्रपती यांनी राफेल विमानाबाबत माहिती दिल्यानंतर काही प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांचे सरकारने समाधान करावे. पुर्वी ठरवलेल्या विमानांपेक्षा आता कमी विमान खरेदी करण्यात आले. राफेल करार करण्यासाठी फक्त पंतप्रधानच गेले होते. त्यांच्यासोबत संरक्षनमंत्री का गेल्या  नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राफेल विमानाचे कंत्राट एचएएल कंपनीला का दिले नाही? असा प्रश्न करत त्यांनी विमानांच्या किंमतीवरून स्वपक्षाच्या धोरणावरच शंका उपस्थित केली आहे.