IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

वी दिल्ली, 04 ऑगस्ट:  IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

कार्यकारी (Executive) – एकूण जागा 920

शैक्षणिक पात्रता

कार्यकारी (Executive) – पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यांचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पहिलं वर्ष – 29,000/- रुपये प्रतिमहिना

दुसरं वर्ष –  31,000/- रुपये प्रतिमहिना

तिसरं वर्ष – 34,000/- रुपये प्रतिमहिना

शुल्क

SC/ST/PWD – रु. 200/-

इतर उमेदवारांसाठी – रु. 1000/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी   https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.