नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ३६ आरोपी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत २ लाख ३५ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन व ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केशव चौधरी, सुभाष खरे, बाळासाहेब पाटील, सुनील सहस्त्रबुद्धे यांनी मोहीम राबविली. बुटीबोरी, पारशिवणी, वडद, नागपूर शहर आदी ठिकाणाहून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत मंगल कोडापे, रोशन शेंडे, महेश बोबडे, विजय कावळे, अनिल मंडले, मनीष उके, संजू तागदेवे, निशिकांत वासनिक, सुनील मिश्रा, प्रभाकर कोडापे, सुखराम जांगडे, गोविंद निखारे, रिंकी परीहार, सोमक्का बेलंकोंडाल, दिनेश डोमेवाले, भीमराव खुले, किशोर टीप्रेवार, नामदेव सुसागडे, नंदलाल कावळे, श्रीनिवास गुडलवार, विलास सोमकुवर, निखिल खोब्रागडे, राहुल भैसवारे, राजेश करपे, अमोल कठाने, मंगेश जैस्वाल, सुषाल मेश्राम, शरद मदनकर, जीवन अकेवार, गजानन बालपांडे, गौरव काकडे, मनीष शिरील फ्रान्सिस, राणी पाल स्टडली या आरोपींवर कारवाई करण्यात आली.
असा जप्त केला माल
मोहदारू : ८३० लिटर
रसायन : २७९० लिटर
देशी दारू : १३१ लिटर
ताडी : ७० लिटर
अधिक वाचा : नागपुरातील कुख्यात वाहनचोर गजाआड