नागपुरातील कुख्यात वाहनचोर गजाआड

नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्यात वाहनचोराला अटक करून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्या. वसीम बेग सिकंदर बेग ( वय २५, रा. बिजलीनगर),असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, सहायक उपनिरीक्षक इंगळे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र गावंडे व त्यांचे सहकारी सदर भागात गस्त घालत होते. पोलिसांनी वसीम याला संशयास्पदस्थितीत पकडले. त्याच्याकडून सीताबर्डी व गिट्टीखदानमधील वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले.

अधिक वाचा : आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास १२ लाख भाविक दाखल