सकाळपासूनच तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानासमोर नागपूरकरांची वाढती गर्दी

तुकाराम मुंढे

नागपूर : महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरकरांनी गर्दी करणे सुरू केले होते. सकाळी ९ वाजता मुंढे हे मुंबईकडे प्रयाण करणार असल्याने आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी त्यांचे समर्थक एकवटले आहेत.

तुकाराम मुंढे यांची नागपुरातील कारकीर्द आरंभापासूनच वादग्रस्त राहिली. लोकप्रतिनिधी व प्रशासन असा हा लढा अखेरीस मुंढे यांच्या बदलीनंतरच थांबला.
कोरोनाच्या काळात मुंढे यांनी नागपुरात अतिशय कडक असे धोरण राबवून कोरोनाचा प्रकोप रोखण्यात यश मिळविले होते. मात्र व्यापारी वर्गाचा दबाव आणि स्थानिक राजकारण याची परिणती त्यांच्या बदलीत झाली होती.
मुंढे यांनी गुरुवारी आपण नागपूरचा निरोप घेत असल्याचे सोशल मिडियावर सांगून, सगळ््यांचे आभार व्यक्त केले होते.