मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नागपूर, ता. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्याला तसेच मनपा मुख्यालयातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, नगरसेविका भावना लोणारे, सहायक आयुक्त महेश धामेचा, महेश मोरोणे, विजय हुमणे, कार्यकारी अभियंता राजेश राहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजेश हाथीबेड, विशाल शेवारे, आनंद आंबेकर, नरेश खरे, विनोद धनविजय, आनंद डोंगरे यांच्यासह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा : कविवर्य सुरेश भट यांना म.न.पा. तर्फे आदरांजली

 

Comments

comments