नागपूर : इलेक्ट्रिक व बांधकाम कंत्राटदार श्रीकांत हरिभाऊ वंजारी (वय ३१ रा. दुर्गेश नंदिनीनगर, नरसाळा) याची हत्या करून पसार झालेला शैलेश केदार हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. सय्यद यांच्या न्यायालयासमोर बुधवारी शरण आला.
न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. गुरुवारी हुडकेश्वर पोलिस त्याला प्रॉडक्श्न वॉरंटवर ताब्यात घेतील. त्यानंतर त्याची पोलिस कोठडी घेण्यात येईल. शैलेश हा गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा आहे. वंजारी हत्याकांडात पोलिसांनी शैलेश याचा नातेवाइक आकाश ऊर्फ विक्की भोसले (रा. सर्वश्रीनगर) व अन्य तिघांना अटक केली आहे. चौघांची २४ मेपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
श्रीकांतने आकाश व शैलेश याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या वादातून ही घटना घडली होती. बुधवारी सायंकाळी शैलेश हा न्यायालयासमोर शरण आला. अॅड. आर. के. तिवारी यांनी शैलेशच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.
अधिक वाचा : वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी मनपा आयुक्तांची अशीही धडपड