नागपूर : रस्त्याने जात असलेल्या २० वर्षीय नविवाहितेचे अपहरण करून तिच्यावर दोन विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापारमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली. देवलापार पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
आकाश केशव सलामे (वय १९) व शुभम ज्ञानराव धुर्वे (वय १८, दोन्ही रा. दुयापार), अशी अटकेतील विद्यार्थ्यांची नावे आहेत. आकाश हा बीए प्रथम वर्षाला शिकतो. शुभम हा नुकताच बारावी पास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. ती माहेरी आली होती.
मंगळवारी सायंकाळी ती मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीला भेटून ती पायी घरी जात होती. याचवेळी आकाश, शुभम व अन्य एक अल्पवयीन मुलगा ट्रिपलसीट मोटरसायकलने जात होते. विवाहिता एकटी असल्याचे बघून शुभमने अल्पवयीन मुलाला घरी पाठविले. त्यानंतर दोघांनी विवाहितेचे तोंड दाबून तिला बळजबरीने नदीजवळ घेऊन गेले. तिच्यावर अत्याचार केला. विवाहिता बेशुद्ध झाली.
काही वेळाने ती शुद्धीवर आली व घरी गेली. तिने नातेइकांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकासह विवाहितेने देवलापार पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास रामटेकच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर यांच्याकडे सोपिवण्यात आला. आलुरकर यांनी दोघांना अटक केली. अटकेतील विद्यार्थ्यांची २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
अधिक वाचा : जलसंकट पर जमकर हुआ बवाल, महापौर पर फेंके पर्चे