नवरा बायकोमध्ये भांडण; आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू

Date:

मुंबई : पैशांवरून नवरा बायकोमध्ये झालेल्या भांडणात एका चिमुकल्याचा हकनाक बळी गेल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली आहे. भांडणांमुळे वैतागलेल्या त्या महिलेने स्वत:च्या पोटच्या मुलाला विष पाजल व स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

सांताक्रुझमध्ये राहणाऱ्या रिना अहिरे (३४) हिचे तिचा पती राजेशसोबत बुधवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रिना त्यांचा पाच वर्षाचा मुलगा हर्षला घेऊन घराबाहेर पडली. तिथून ती जुहू बीचवर गेली. तिथे काही वेळ बसल्यानंतर तिने जवळच असलेल्या एका मेडिकलमधून उंदीर मारण्याचे औषध घेतले. ती ते विषारी औषध स्वत: प्यायली व त्यानंतर उरलेले तिने हर्षला पाजले.

औषध प्यायल्यामुळे हर्षला त्रास होऊ लागल्यानंतर रिनाला तिची चूक लक्षात आली. त्यानंतर ती हर्षला कूपर रुग्णालयात नेले मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी रिना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र रिनावर देखील अद्याप उपचार सुरू असल्याने तिला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी याविषयी रिनाच्या नवऱ्याला कळविल्यानंतर त्याला जबर धक्का बसला आहे.

अधिक वाचा : ‘समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या’- शिवसेना

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...