रहदारीची व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूर मेट्रोची सायकल स्टॅन्ड उपाययोजना

रहदारीची व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूर मेट्रोची सायकल स्टॅन्ड उपाययोजना

नागपूर : शहराचा एकंदरीतच कायापालट करून रहदारीची व्यवस्था सुधारणे त्याहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत अन प्रवास सोयीस्कर व सुखकर करणे या अनुषंगाने महामेट्रो नागपूरने अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक महत्वपूर्ण बदल म्हणजे नागरिकांना फस्ट टू लास्ट माईल फीडर सर्व्हिस मिळावी या दृष्टीने मोबाइक आणि सायकलची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी शहरात सायकल ट्रॅक आणि सायकल स्टॅन्ड तयार होऊ लागले आहेत.

सिम आणि जीपीएस सिस्टिमने जोडलेल्या या शेअरिंग मोबाइक आणि सायकल ओटीपी किंवा क्यूआर कोडने लॉक-अनलॉक करता येतील. शहरातील सार्वजनिक ठिकाणी, स्थानकांवर तसेच अनेक कार्यालयात सायकल स्टॅन्ड तयार केले जातील. केवळ शहराची वाहतूक व्यवस्थाच नाही तर नागरिकांच्या आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

अधिक वाचा : नागपूर रेल्वे स्थानकावर ‘वन एंट्री वन एक्झिट’ सिस्टम लागू