नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अखेर सात महिन्यांनंतर कायमस्वरुपी अधीक्षक मिळाला. गृह विभागाने सोमवारी राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. भंडाराच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक रश्मी जे. नांदेडकर यांची नागपूर एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अनिकेत गंगाधर भारती हे भंडाऱ्याचे अतिरिक्त अधीक्षक असतील. डिसेंबर महिन्यात विनयभंग प्रकरणात एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून एसीबीचे अधीक्षकपद रिक्त होते. अमरावती एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे नागपूर एसीबीचा अतिरिक्त कारभार होता.
नागपूर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्याकडे बीडच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपिवण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता मालेगावचे नीलोत्पल परिमंडळ पाचचा कार्यभार पाहतील. नागपूर लोहमार्गचे अधीक्षक अमोघ गावकर यांची अकोला पोलिस अधीक्षकपदी, तर अतुल कुलकर्णी यांची अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर लोहमार्गचा कार्यभार विश्व पी. पानसरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मंगेश पोपटराव शिंदे हे गोंदियाचे पोलिस अधीक्षक, तर निखिल एन. पिंगळे अतिरिक्त अधीक्षक असतील. विनिता साहू यांची नवी मुंबई येथे मुख्यालयात बदली करण्यात आली. प्रशांत होळकर यांची अमरावती शहर पोलिस उपायुक्त येथे बदली करण्यात आली. लोहित मतानी हे राज्य राखीव पोलिस दल गटक्रमांक नऊचे समादेशक असतील. श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे नागपुरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक चारचा कारभार सोपविण्यात आला आहे.
सीआयडीचे अधीक्षक रंनजकुमार शर्मा यांची बृहन्मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी साताराच्या रजिया बालेखान म्हैसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांची अमरावती ग्रामीणच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. नीलेश हनुमंत हे वर्धेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक असतील.
अधिक वाचा : पत्नी के प्लान में उलझा पति, दर्शकों ने लगाए ठहाके