कोल इंडियाच्या नावे बनावट कंपनी

Date:

नागपुर: कोल इंडियाची कंपनी असल्याचे भासवून एका कंपनीने सरकारी लोगोचा गैरवापर करीत बनावट संकेतस्थळांवरून तब्बल ८८,५८५ पदांची जाहिरात दिली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठया संख्येत पदभरती असल्याने मोठया संख्येत सुशिक्षित तरुणांनी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरला. मात्र, काहींना शंका आल्याने खोलवर तपासणी केली असता हे संकेतस्थळच बनावट असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे कोल इंडिया लिमिटेडप्रमाणेच हुबेहुब सरकारी लोगो वापरून ‘एससीसीएलसीआयएल’ अशी कंपनीने २५ जुलैला ही जाहिरात दिली.

नागपुरातील एका अर्जदार असलेल्या विद्यार्थ्यांने या संकेतस्थळाची माहिती घेत थेट कोल इंडियाच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. कोल इंडियाचे चेअरमन ए. के. झा यांनी या नावाची कोल इंडियाची कुठलीही कंपनी नसल्याचे स्पष्ट करीत, या कंपनीपासून आणि काढण्यात आलेल्या रिक्त पदांच्या भरतीपासून अर्जदारांनी सावध राहावे असे आवाहन केले आहे. नागपुरातून या पदांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी चालानद्वारे ऑनलाईन शुल्क भरले आहेत. देशभरातून यासाठी अर्ज आले असतील. त्यामुळे या बनावट कंपनीने आतापर्यत बेरोजगार युवकांची कोट्यवधीने फसवणूक केल्याचे उघडकीस येत आहे. नागपुरातील सुबोध चहांदे या तरुणाने SCCLCIL.in या संकेतस्थळाला भेट दिली असता त्याला ही कंपनी बोगस असल्याची शंका आली. नंतर सुबोधने थेट कोल इंडियाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार पुढे आला.

या आहेत कोल इंडियाच्या खऱ्या कंपनी:-
-भारत कोलींग कोल लिमिटेड
-सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड
-महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड
-नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड
-साऊथ इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड( एससीसीएल)
-वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड(डब्लूसीएल)
-सेंट्रल माइन प्लानिंग अॅंड डिझाईन इंन्स्टिटयूट
-कोल इंडिया आफ्रिकन लिमिटेड
-नॉर्थ ईस्टर्न कोलफिल्ड्स

या बोगस पदाची जाहिरात
-एमटीएस सर्व्हेयर : २०,३९०
-अकाऊन्ट क्लर्क : ३२२
-अकाऊंटंट: १४०
-ज्युनिअर क्लर्क : ३८२
-कम्प्युटर ऑपरेटर : ५२२४
-स्टेनोग्राफर(इंग्रजी): १६००
-स्टेनोग्राफर (मराठी): १६००
-सेक्रेटरीयल असिस्टंन्ट : ५६०
-इलेक्ट्रीशियन : ५९७०
-फिटर :४३७६
-वेल्डर (गॅस/इलेक्ट्रीक): ३२००
-वेल्डर (एमआयजी): ४३८०
-टर्नर :७४३०
-मेकॅनिक : ६१३५
-डिझल मेकॅनिक :४८५०
-ड्राप्ट्समन :२४८०
-ड्राप्ट्समन (मेकॅनिक)NJ : ३७९८
-प्लंबर: ५६७०
-कार पेंटर : ४२००
– ट्रेड सुपरवायझर: २२३०
-हेवी व्हेईकल ड्रायव्हर : ७२०
-ज्युनिअर सिव्हिल इंजिनीअर: ४३०
-जुनिअर मेकॅनिकल :४३०
-ज्युनिअर इलेक्ट्रीशियन : ४३०
-असिस्टंट मॅनेजर : १७८
…………………………………
एकूण : ८८,५८५

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related