नागपूर मौजा वांजरा येथील अतिक्रमण पाडले

Date:

नागपूर : मौजा वांजरा येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अतिक्रमण नासुप्रच्या पथकाने गुरुवारी हटविले. खसरा क्रमांक ३० व ३५ येथे हे अतिक्रमण करण्यात आले होते.

अतिक्रमण हटविण्यासाठी नासुप्रने नोटीस पाठविल्या होत्या. मात्र, प्रकरण न्यायालयात गेले. भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर नासुप्रच्या पथकाने ही कारवाई केली. एक जेसीबी आणि एक टिप्परच्या साहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.

यावेळी कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, विभागीय अधिकारी अनिल राठोड, कनिष्ठ अभियंता सुधीर राठोड, सहायक अभियंता हेमंत गाखरे, नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा : सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related