‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान

Date:

नागपूर : दुसऱ्या टप्प्यात निवड होऊनही ‘स्मार्ट सिटीप्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहे. यावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानेही शिक्कामोर्तब केले. शहरातील पूर्व नागपुरातील १७३० एकरांत हा प्रकल्प राबविण्यात येत असून नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय दर आठवड्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मानांकन जाहीर करीत असून मागील आठवड्यात नागपूर अव्वल स्थानी कायम आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून नागपूर अव्वल स्थानी आहे. पूर्व नागपुरात भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडीचा काही भाग, अशा एकूण १७३० एकरांत स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत असून जागतिक दर्जाच्या शापूर्जी पालनजी या कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे.

या क्षेत्रासाठी राज्य सरकारने टाऊन प्लॅनिंग स्कीमही मंजूर केली. गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पात ५५ किमीचे नवे रस्ते तयार करण्यात येणार असून व्यावसायिक संकुल, सिवेज लाइन, ड्रेनेज लाइन, फूटपाथ, उद्यान, वैद्यकीय सुविधांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामाच्या निविदा मंजुरी, कार्यादेश आदीच्या आधारावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने काल, ६ फेब्रुवारी रोजी घोषित केलेल्या मानांकनात नागपूरचे स्थान अव्वल आहे.

विशेष म्हणजे नागपूरचे नाव स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत घोषित करण्यात आले होते. त्यानंतरही नागपूरच्या स्मार्ट सिटी एसपीव्हीने अंमलबजावणीत अव्वल स्थान पटकावले. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश होता. सद्यस्थितीत पुणे व सोलापूर दोन्ही शहरे मागे पडली आहेत. दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशातील भोपाळ शहर असून रांची तिसऱ्या तर गुजरातेतील अहमदाबाद व सुरत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहे.

अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर शंभर फूट उंच तिरंगा

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...