राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ”शाॅक”

Date:

मुंबई : गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीनंतर आता राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा “शाॅक” दिला आहे. मात्र २०१८-१९ या वर्षासाठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे.ही दरवाढ १ सप्टेंबर २०१८ पासून नवीन दर लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०१८ -२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रती युनिट करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.

एकीकडे राज्यातील जनतेला वीजदर वाढ केली असतानाचा २०१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात येवून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसीटी व टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अधिक वाचा : एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...

Building on Decades of Cooperation: Länd Here Campaign Invites Skilled Workers From Maharashtra to Germany’s Baden-württemberg

Decades of Partnership: Länd Here Campaign Welcomes Skilled Workers...