घटस्फोटीत महिला शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन झाली फरार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घ्यायची ट्यूशन

घटस्फोटीत महिला शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन झाली फरार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घ्यायची ट्यूशन

हरियाणाच्या पानीपत शहरात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षिकेने १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला घेऊनच फरार झाली आहे. पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत ती शिक्षिका शिकवायला होती. शिक्षिका घटस्फोटीत महिला असून ती माहेरीच राहायला होती.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, दरदिवशी प्रमाणे माझा मुलगा २९ मे रोजी दुपारी २ वाजता महिला शिक्षिकच्या घरी ट्यूशनसाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शिक्षिकेच्या घरच्यांनी सुरुवातीला यावर काही तास उलटल्यानंतरही काहीच केले नव्हते. त्यानंतर शिक्षिकेच्या वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली.

शिक्षिकेच्या घरी शिकण्यासाठी गेला होता विद्यार्थी

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून सध्या शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. परंतु अद्याप दोघांचाही पत्ता लागला नाही. गायब झाल्यापासून दोघांनीही त्यांचे मोबाईल बंद ठेवले आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलाच्या वडिलांनी सांगितलं आहे की तो ११ वीच्या वर्गात होता. तर संशयित आरोपी महिला क्लास टीचर आहे.

अल्पवयीन विद्यार्थी गेल्या २ वर्षापासून शिक्षिकेच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात होता. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थी दिवसातून ४-५ तास शिक्षिकेच्या घरी ट्यूशनसाठी थांबत होता. त्यानंतर २९ मे रोजी दोघंही अचानक गायब झाले. आश्चर्य म्हणजे दोघंही घरातून काहीच सामान घेऊन गेले नाहीत. केवळ शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे.