बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर

नागपूर : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमीवर आल्यावर त्यांनी दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.

यावेळी मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आपण नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला नेहमी भेट देत असतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंचित, मागासवर्गीयांसाठी योगदान अमूल्य आहे. त्यांनी आपल्या संस्कृतीचा आदर करीत बौध्द धर्माचा स्वीकार केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार हे आरक्षणाबद्दल कटिबद्ध आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

अधिक वाचा : ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान

Comments

comments