नागपूर : कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत विदर्भात शुक्रवारी अचानक पाच रूग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. शुक्रवारी नागपुरात आणखी पाच रूग्णाच्या नमुन्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शुक्रवारचे नवे रूग्ण मिळून नागपुरातील कोरोनाबाधित रूग्ण संख्या १० एवढी झाली होती. मात्र, एका रूग्णाचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याला काल रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ९ एवढी झाली आहे तर यवतमाळातील ४ रूग्ण मिळून विदर्भात कोरोनाचे १३ रूग्ण झाले आहेत,असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.
अधिक वाचा : Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
दिल्लीहून परतलेल्या ज्या रूग्णाचे नमुने गुरूवारी पॉझिटीव्ह आढळले होते त्याच रूग्णाच्या परिवारातील आणखी तीन जणांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर एक रूग्ण हा त्यांच्याच घरी काम करणारा व्यक्ती आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णामध्ये एक रूग्ण गोंदियाचा रहिवासी आहे. यवतमाळ मध्येकोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ वर स्थिरावली आहे. यवतमाळ मधील दोन रूग्णाच्या प्रकृतीत ही सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाने काल सांगितले आहे.