नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. १ ऑगस्ट रोजी अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून या यात्रेस प्रारंभ झाला…
लाइव्ह अपडेट्स :
नागपूर –
>> महाजनादेश यात्रेचे नागपूरमधील चिंच भवन येथे आगमन.
वर्धा –
>> ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलन करण्याऐवजी जनतेत जा, जनतेची किमान सहानुभूती मिळेल- मुख्यमंत्री
>> ‘ईव्हीएम’ला दोष देण्याऐवजी विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं… मुख्यमंत्र्यांचा टोला
>> आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला अभूतपूर्व विजय मिळेल-फडणवीस
>> दुष्काळमुक्ती हे आमचं यापुढचं ध्येय असेल… वर्ध्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन
>> महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ५ वर्षांमध्ये केलेलं काम सांगतोय- मुख्यमंत्री
>> महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस आज वर्ध्यात… पत्रकार परिषदेत विरोधकांवर डागली तोफ
अधिक वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलनाऐवजी जनतेत जा, सहानुभूती मिळेल