तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

नागपुर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमदार अणि महाराष्ट्र चे पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबल यांनी सोमवार ला सभागृहात प्रवेश केला. सभागृहात येताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार छगन भुजबळ यांच्यात आज चांगलीच खडाजंगी झाली. तब्बल तीनवर्षानंतर भुजबळ प्रथमच आज विधान सभेत आले आणि त्यांनी जोरदार भाषण दिले. आज भुजबळ यांनी सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले त्यादरम्यान भुजबळांच्या आरोपांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले.
भुजबळ म्हणाले, सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडवली आहे. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर 3-4 महिन्यातच 11 हजार कोटींच्या पुरवणी मागण्याची गरज का पडली? असा सवाल पुरवणी मागण्यावरील चर्चेत सभागृहात उपस्थित केला. राज्यात 50 कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे. पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यात व्यस्त असल्याने आदिवासींची वन हक्कांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या आरोपावरून विधानसभेत वातावरण तापले. वनपट्टे वाटप वनविभाग करत नसल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांचे जनरल नॉलेज बिघडवू नका, 2006 पासून हा प्रश्न आहे. तुम्ही काय केले तेही सांगा. त्यावर तुम्ही काय दिवे लावत आहात. खोटे नाटे बोलून तुम्ही सत्तेवर आहात, असे भुजबळांनी मुनंगटीवारांना सुनावले. यानंतर मुनगंटीवार एवढे संतापले कि, त्यांचा आवाज चढला. ते काय बोलतील या भीतीपोटीच शेजारचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत घातली.
Chagan bhujbal at nagpur
नागपूर पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सर्व्हेक्षण सुरु असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकारची कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. जोरदार पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज बंद झाल्याने कामकाज स्थगित करण्‍यात आले होते. हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश तरी काय आहे ? असा सवाल अजित पवारांनी सत्ताधाऱ्याना केला.