नागपूर- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजकडून आज ९ ऑगस्टला क्रांतीदिनी नागपूर बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पार पडेल, अशी ग्वाही सकल मराठा समाजतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
९ ऑगस्टला बंदची माहिती देताना सकल मराठा समाजच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राज्य शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. आरक्षण देण्याची प्रक्रिया धिमी आहे. त्यामुळे सकल मराठा समाजने जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर महाराष्ट्र बंद ची हाक दिली . त्याअंतर्गत नागपुरात ९ ऑगस्टला बंद चे आवाहन केले.
मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने राज्य सरकारने या संस्थेला विनंती करण्यापेक्षा यंत्रणा राबवून आयोगास साधन, सामग्री. मनुष्यबळ द्यावे. त्यामुळे आयोगास अहवाल तयार करण्यात ही बाब साह्यभूत ठरू शकेल, असेही समाजने नमूद केले. शासनाने आयोगाची स्थापना उशिरा केली. त्यामुळे सर्वेक्षण, निवेदनांची प्रक्रिया उशिरा सुरु झाली. उच्च न्यायालयात दस्तऐवज सादर न झाल्याने तारीख देण्याचे काम झाले. त्यापायी न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दरम्यान समाजात असंतोष होऊन ठोक आंदोलन झाले. तोडगा निघेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असेही समाजने स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी असेल पूर्ण बंद
अहमदनगर
हिंगोली
सोलापूर
वाशिम
परभणी
सातारा
कोल्हापूर
सांगली
औरंगाबाद
बंद नसेल मात्र शांततेत आंदोलन असणार
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
नाशिक
धुळे
ठाण्यात बंद नाही