नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. सकाळी अकरा वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ करतील. पाहुयात, बजेटशी संबंधित क्षणोक्षणीचे अपडेट.
अपडेट्स :
>> नागरिकांना आता पॅन किंवा आधार यापैकी कुठलाही एक नंबर देण्याची सुविधा
>> १२० कोटींहून अधिक भारतीयांकडे आधार
>> स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना भरमसाठ करसूट
>> इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील जीएसटी १२ टक्क्यांवरू ५ टक्के करणार
>> सरकारचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य १.५ लाख कोटी
>> १, २, ५, १० आणि २० रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात येणार
>> देशात १७ आदर्श पर्यटन स्थळं उभारणार
>> सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी बँकांना ७० हजार कोटींची मदत देणार
>> बँकांनी विक्रमी ४ लाख कोटींची कर्जवसुली केली
>> बँकांच्या अनुत्पादीत मालमत्तेत (NPA) मोठी घट
>> १८० दिवसांची वाट न पाहता अनिवासी भारतीयांना (NRI) तातडीने आधार कार्ड देणार
>> दोन कोटी शेतकऱ्यांना डिजिटल शिक्षण देणार
>> महिला सक्षमीकरणासाठी समिती नेमणार
>> अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान महत्त्वाचे, ग्रामीण क्षेत्रातही महिलांचे बहुमोल योगदान
>> आतापर्यंत ३० लाख नागरिक पेन्शन योजनेशी जोडले गेले
>> रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची मोठी योजना
>> ३५ कोटी एलईडी बल्ब आतापर्यंत वाटण्यात आले
>> एलईडी बल्बला योजनेला अधिक प्रोत्साहन देणार
>> कामगार नियम अधिक सुलभ करणार
>> स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनवरून विशेष कार्यक्रम सुरू करणार
>> मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल राबवणार
>> नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार, उच्च शिक्षणाला चालना देणार
>> शहरांना जोण्यासाठी उपनगरीय रेल्वेत अधिक गुंतवणूक करणार
>> स्वच्छ भारत योजना प्रत्येक गावात नेणार
>> अर्थसंकल्प सुरू असताना शेअर बाजारात मोठी घसरण
>> २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
>> शेतकऱ्यांना कुशल बनवण्यासाठी झीरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन देणार
>> पाच वर्षांत १.२५ लाख कोटींचे रस्ते बांधणार
>> कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करणार
>> देशातील गरीबांना १.९५ कोटी घरं देणार
>> मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी पायभूत सुविधांवर भर देणार
>> गावातील प्रत्येक कुटुंबाला वीज आणि गॅस कनेक्शन देणार
>> २०२२ पर्यंत प्रत्येक गावात वीजपुरवठा करण्यात येणार
>> गाव, गरीब आणि शेतकऱ्यांवर सरकारचा अधिक भर
>> अॅनिमेशन कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक वाढवणार
>> मीडियातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार
>> विमा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
>> रेल्वे रूळ बांधण्यासाठी पीपीपी मॉडेलला मंजुरी
>> सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर अफोर्डेबल हाउसिंग योजना सुरू करणार
>> निधी उभारण्यासाठी सरकारी जमिनी विकणार
>> वीज निर्मिती क्षेत्राला चालना देणार
>> २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
>> इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणारः सीतारामण
>> राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या रचनेत बदल करणार
>> भारताची अर्थव्यवस्था सध्या २.७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
>> भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या पाचव्या क्रमांकावर
>> अमेरिका आणि चीननंतर भारताची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने
>> लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता
>> भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ३ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाईल
>> जनतेच्या सहकार्याने देश प्रगतीची नवी उंची गाठेल
>> संसदेत अर्थसंकल्पाला सुरुवात
>> केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला दिली मंजुरी, निर्मला सीतारामण लवकरच संसदेत अर्थसंकल्प मांडणार
>> अर्थसंकल्पाच्या प्रति संसदेत आणल्या
>> कॅबिनेट बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल.
>> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसद भवनात दाखल.
>> सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होणार.
>> अर्थसंकल्पाची पहिली प्रत राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द.
>> बजेटआधी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
>> केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट.
>> दरवर्षी दिसणाऱ्या लाल सुटकेस ऐवजी यावर्षी पहिल्यांदाच लाल कपड्यात बजेट दिसले.
>> केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाची टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात.
>> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण थोड्याच वेळात संसदेत पोहोचणार
>> अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी. सेन्सेक्स ११९.१५ अंकांची उसळी घेत ४०, ०२७ पर्यंत पोहोचला
>> अर्थसंकल्प २०१९ च्या प्रतींसह अर्थ मंत्रालयाबाहेर अर्थमंत्री निर्मला सितारामन… सोबत अनुराग ठाकूर, वित्त सचिव एस. सी. गर्ग आणि मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम दिसत आहेत.
>> केंद्रीय अर्थसंकल्पात न्यू इंडियाची झलक दिसण्याची शक्यता
>> दिल्लीः थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार.
>> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थ मंत्रालयात पोहोचले.
>> केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी बजेट सादर करण्यापूर्वी प्रार्थना केली. सीतारामण यांच्या बजेटची तयारी करणाऱ्या टीममध्ये ठाकूर यांचा सहभाग.
>> भारतीय अर्थव्यवस्थेपुढे कमी विकासदर, जागतिक मंदी आणि व्यापारयुद्धासारखी आव्हाने आहेत
>> कर प्रणाली अधिक सोयीस्कर करणे, तसेच कमी व्याजदरावर लक्ष केंद्रीत करत भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा होणार प्रयत्न
>> गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार या अर्थसंकल्पात खासगी गुंतवणुकीच्या मदतीने रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल
>> मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील पहिला अर्थसंकल्प आज ११ वाजता होणार सादर… अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार
अधिक वाचा : नागपूर ‘बुध्दिस्ट थीम पार्क’ला मान्यता