बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड

Date:

RBI to Penalise Banks if non-availability of cash in ATMs: मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान RBI ने यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे.

बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल दंड .(ATM Service) ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. पैसे काढण्याचं महत्त्वाचं काम बँकेत न जाता या सेवेमुळे करता येतं, तेही वेळीची बचत करून. मात्र काही वेळा एटीएममध्ये पैसे नसल्यास (non-availability of cash in ATMs) ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे. एटीएममध्ये रोख रकमेचा होणारा तुटवडा दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. 1 ऑक्टोबरपासून हा महत्त्वाचा निर्णय लागू होत आहे.

महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी अशाप्रकारे एटीएममध्ये कॅश नसेल तर बँकाना हा दंड भरावा लागणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होत आहे. महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त काळासाठी एटीएममध्ये कॅश नसल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘ATM मध्ये रोख रक्कम नाही भरल्यास आकारण्यात येणारा दंड हे सुनिश्चित करेल की लोकांच्या सुविधेसाठी या मशिन्समध्ये पर्याप्त रक्कम उपलब्ध असेल.’

पुढे वाचा:

IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोटा जारी केल्या जातात, बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटा वितरित करतात. दरम्यान एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची टाळता येणारी गैरसोय निर्माण होते. अशा परिस्थितीत आरबीआयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की, हा निर्णय याकरता घेण्यात आला आहे की, बँक किंवा व्हाइट लेबल एटीएम संचालकांकडून (White Label ATM Operators WLAOs) हे सुनिश्चित केले जाईल की एटीएममध्ये रोख वेळेत भरली जात आहे आणि लोकांना कोणतीही समस्या येत नाही आहे. व्हाइट लेबल एटीएमच्या प्रकरणात दंड संबंधित एटीएममध्ये कॅशची पूर्तता करणाऱ्या बँकांवर आकारला जाईल. व्हाइट लेबल एटीएम्सचे संचालन गैर-बँकिंग कंपन्या करतात.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...