प्रदर्शनाआधीच ‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’ लीक

नागपूर : अॅव्हेंजर्स सिरीजचा शेवटचा भाग ‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच हा हॉलिवूडपट लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. तमीळरॉकर्स डॉट कॉम नावाच्या वेबसाइटवर हा संपूर्ण सिनेमा लीक झाल्याचं सुत्रांकडून समजतं. तामीळ रॉकर्सच्या वेबसाइटवर हा सिनेमा उपलब्ध असल्याचे स्क्रीनशॉट्स काही सिनेरसिकांनी ट्विटरवर शेयर केले आहेत.

या आधीही ‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’चे काही व्हिडिओ लीक झाले होते. तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पॉइलर्स आणि चित्रपटाविषयीची इतर माहिती लीक करू नका, असं आवाहन केलं होतं. तरीही तमीळ रॉकर्सच्या वेबसाइटवर हा संपूर्ण सिनेमा लीक केला आहे.

‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’ या हॉलिवूडपटाआधी तमीळ रॉकर्स वेबसाईटनं हॉलिवूड, बॉलिवूड आणि दक्षिणेतील इतरही अनेक सिनेमे लीक केले होते. ही वेबसाइट चालवणाऱ्या काही लोकांना २०१८मध्ये अटक करण्यात आलं होतं. तरीही या वेबसाइटवरून चित्रपट लीक होत आहेत. तमीळ रॉकर्स ही वेबसाईट सरकारकडून अनेकदा ब्लॉक करण्यात आली होती, पण प्रत्येकवेळी नवीन डोमेन आणि आईपीसोबत ही वेबसाइट पुन्हा सक्रिय होते.

अधिक वाचा : अकोला देशात ‘हॉट’; तापमान ४५.१ अंश सेल्सिअस