प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी ‘बेस्ट एक्टर’ हा पुरस्कार मिळाला. प्रसाद कदम यांनी ‘हॅपी बर्थ डे’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती एफएनपी मीडियाने केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा प्रमुख भूमिकेत होते. पुरस्कार मिळाल्याचे कळताच अभिनेते अनुपम खेर यांनी आनंद व्यक्त केला. अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. आहना कुमरा यांचे त्यांनी विशेष आभार मानले. अनुपम खेर यांनी त्यांचाय इन्स्टाग्राम अकाउंटवरही यासंबंधी एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मला न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिल्म’ हा पुरस्कार पण मिळाला. एकाच फिल्मसाठी दोन पुरस्कार मिळाल्यामुळे निर्माता गिरीश जौहर यांनीही आनंद व्यक्त केला. अनुपम खेर हे एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली; असे गिरीश जौहर म्हणाले.
“एफएनपी मीडियासाठी ही एक मोठी बाब आहे. एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात 2 पुरस्कार मिळवणे एक अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटामागील संपूर्ण टीमचं प्रयत्न आहे आणि खरोखरच चित्रपट पुरस्कारास पात्र आहेत.” एफएनपी मीडियाचे कंटेंट हेड अहमद फराज ह्यांचे म्हणणे आहे. ‘हॅपी बर्थडे’ लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.