Mumbai Rain Alert: मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईतील लोकल ट्रेन १०-१५ मिनिटे उशिराने उशिराने धावत आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना वेळेवर ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर झाला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत मुंबई आणि ठाण्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु झाल्या आहेत. मेन लाईन, हार्बर मार्गावर काही गाड्या 10-15 मिनिटे उशिराने धावत आहेत. ट्रान्स हार्बर आणि बेलापूर आणि नेरुळ-खारकोपर मार्गावर गाड्या सुरळीत सुरू आहेत.
शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या IMD च्या अंदाजाबाबत ट्विट करत मध्य रेल्वेने सांगितले की, मेन हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथ्या कॉरिडॉर वरील गाड्या मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत चालू होत्या. सकाळी १०:३० वाजता पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली.