व्हॉट्स ॲप नेहमी नव नवीन बदल करते. वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फिचर्स देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता व्हॉट्स ॲप च्या मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरबाबत मोठी चर्चा आहे. हे फीचर रोलआउट करण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. आता वापरकर्ता या फीचरच्या मदतीने फोनशिवाय इतर चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकाच वेळी व्हॉट्स ॲप वापरु शकणार आहेत.
फोन अॅक्टिव्ह नसताना किंवा इंटरनेट कनेक्टेड नसतानाही वापरकर्ता इतर डिव्हाईस लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्स ॲप वरती चॅटींग करू शकतात. पण दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्स ॲप ॲक्सेस करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेच आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरची मध्ये या खास गोष्टी आहेत.
आता वापरकर्ते फोनमध्ये अॅक्टिव्ह नसल्यासही व्हॉट्स ॲप चं डेस्कटॉप किंवा वेब वर्जन सुरू राहील. नवं फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरू केलं आहे. अस व्हॉट्स ॲपचे प्रमुख विल कॅथकार्टने यांनी माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली आहे.
कंपनी सुरुवातीला हे फीचर अशा युजर्ससाठी उपलब्ध करत आहे, जे व्हॉट्सअॅपच्या बीटा प्रोग्रामचा भाग आहेत. कंपनी येणाऱ्या काळात स्टेबल वर्जन युजर्सला बीटा वर्जनमध्ये स्वीच करण्याचा ऑप्शन देईल. त्याशिवाय हा ऑप्शन व्हॉट्सअॅपच्या Linked Devices स्क्रीनमध्येही ऑफर केला जाऊ शकतो.
व्हाॅट्स अॅप ग्राहकांना नेहमी नवीन फिचर्स देत असते. काही दिवसांपूर्वी व्हाॅट्स अॅप पेमेंटची सुविधा सुरु केली आहे. व्हाॅट्स अॅप वरुन ग्राहकांना पैसेही पाठवता येणार आहेत.
विंडोज आणि मॅक डेस्कटॉप अॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल
व्हॉट्स अॅप च्या विंडोज आणि मॅक डेस्कटॉप अॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी होती, पण आता हे भारतातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.
जे दररोज व्हॉट्सअॅप डेस्कटॉप कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी वापरतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.