एसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी

Maharashtra State Board

पुणे : एसएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनानुसार लागेलला आहे. निकालाचा टक्केवारी ९९.५५ टक्के इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल १०० टक्के आहे. त्याचबरोबर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एसएसएसी निकाल यामध्ये ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गूण मिळाले आहेत. आज दुपारी १ वाजता एसएससी निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहेत.