भाजपचे १२५ उमेदवार जाहीर; खडसे, तावडेंचं नाव नाही!

Date:

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपल्या १२५+ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व विद्यमान मंत्री विनोद तावडे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्यानं भाजपनं अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं आज उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर, गिरीश बापट खासदार झाल्यामुळं रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गणेश नाईक, एकनाथ खडसे यांची नावे नाहीत!

१२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नाही. खडसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळंच त्यांचं नाव तूर्त जाहीर झालं नसल्याचं बोललं जात आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचं नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. तर, अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपची पहिली यादी

१) नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
२) कोथरूड – चंद्रकांत पाटील
३) नंदूरबार – विजयकुमार गावित
४) नवापूर – भारत गावित
५) रावेर – हरीभाऊ जावळे
६) भुसावळ – संजय सावकारे
७) अकोला (प.) – गोवर्धन शर्मा
८) अकोला (पू.) – रणधीर सावरकर
९) जामनेर – गिरीश महाजन
१०) जळगाव जामोद – संजय कुटे
११) शहादा – राजेश पडवी
१२) जळगाव शहर – सुरेश भोळे
१३) सिंदखेडा – जयकुमार रावल
१४) धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे
१५) अमळनेर – शिरीष चौधरी
१६) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
१७) माण – जयकुमार गोरे
१८) तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
१९) अकोले – वैभव पिचड
२०) राहुरी – शिवाजीराव कर्डिले
२१) औसा – अभिमन्यू पवार
२२) वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
२३) नाशिक मध्य – देवयानी फरांदे
२४) ऐरोली – संदीप नाईक
२५) शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
२६) इंदापूर – हर्षवर्धन पाटील
२७) अमरावती – सुनील देशमुख
२८) वर्धा – पंकज भोयर
२९) मूर्तिजापूर – हरीश पिंपळे
३०) पुणे कँटोन्मेंट – सुनील कांबळे
३१) वाशिम – लखन मलिक
३२) कारंजा – राजेंद्र पटणी
३३) दर्यापूर – रमेश बुंदिले
३४) मोर्शी – डॉ. अनिल बोंडे
३५) आर्वी – दादाराव केंचे
३६) हिंगणघाट – समीर कुणावार
३७) नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
३८) उमरेड – सुधीर पारवे
३९) हिंगणा – समीर मेघे
४०) राजुरा – संजय धोत्रे
४१) आमगाव – संजय पूरम
४२) मलकापूर – चैनसुख संचेती
४३) चिखली – श्वेत महाले
४४) खामगाव – आकाश फुंडकर
४५) अकोट – प्रकाश भारसाकळे
४६) सावनेर – राजीव पोतदार
४७) नागपूर दक्षिण – मोहन मते
४८) नागपूर मध्य – विकास कुंभारे
४९) नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
५०) नागपूर उत्तर – मिलिंद माने
५१) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
५२) तिरोरा – विजय रहांगदले
५३) आरमोरी – कृष्णा गजभे
५४) गडचिरोली – देवराव होली
५५) चंद्रपूर – नाना शामकुळे
५६) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
५७) चिमूर – किर्तीकुमार भांगडिया
५८) वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
५९) राळेगाव – अशो उइके
६०) यवतमाळ – मदन येरावार
६१) आर्नी – संदीप धुर्वे
६२) भोकर – बापुसाहेब गोर्ठेकर
६३) मुखेड – तुशार राठोड
६४) हिंगोली – तानाजी मुटकुळे
६५) परतूर – बबनराव लोणीकर
६६) बदनापूर – नारायण कुचे
६७) भोकरदन – संतोष दानवे-पाटील
६८) फुलंब्री – हरीभाऊ बागडे
६९) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
७०) परळी – पंकजा मुंडे
७१) गंगापूर – प्रशांत बम
७२) चांदवड – राहुल आहेर
७३) नाशिक पश्चिम – सीमा हिरे
७४) डहाणू – पास्कल धनारे
७५) विक्रमगड – हेमंत सावरा
७६) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
७७) मुरबाड – किसन कथोरे
७८) कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
७९) डोंबिवली – रवींद्र चव्हाण
८०) मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
८१) ठाणे – संजय केळकर
८२) दहिसर – मनीषा चौधरी
८३) मुलुंड – मिहीर कोटेचा
८४) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
८५) चारकोप – योगेश सागर
८६) घाटकोपर (प.) – राम कदम
८७) गोरेगाव – विद्या ठाकूर
८८) विलेपार्ले – पराग अळवणी
८९) सायन कोळीवाडा – तामीळ सेल्वन
९०) वडाळा (मुंबई) – कालिदास कोळंबकर
९१) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
९२) बेलापूर – मंदा म्हात्रे
९३) पनवेल – प्रशांत ठाकूर
९४) पेन – राजीवशेठ पाटील
९५) शिरूर – बाबुराव पाचर्णे
९६) चिंचवड – लक्ष्मण जगताप
९७) पुणे पर्वती – माधुरी मिसाळ
९८) कसबा पेठ – मुक्ता टिळक
९९) भोसरी – महेश लांडगे
१००) वडगाव शेरी – जगदीश मुळीक
१०१) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
१०२) खडकवासला – भीमराव तापकिर
१०३) हडपसर – योगेश टिळेकर
१०४) कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
१०५) सातारा- शिवेंद्रराजे भोसले
१०६) कराड दक्षिण – अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)
१०७) नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
१०८) शेवगाव – मोनिका राजळे
१०९) श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
११०) कर्जत जामखेड – राम शिंदे
१११) गोराई – लक्ष्मण पवार
११२) माजलगाव – रमेश अडसकर
११३) अष्टी – भीमराव धोंडे
११४) अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील
११५) निलंगा – संभाजी पाटील-निलंगेकर
११६) सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
११७) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
११८) वाई – मदन भोसले
११९) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
१२०) इचलकरंजी – सुरेश हाळवणकर
१२१) मिरज – सुरेश खाडे
१२२) सांगली – सुधीर गाडगीळ
१२३) शिराळा – शिवाजीराव नाईक
१२४) जत – विलासराव जगताप
१२५) अंधेरी पश्चिम – अमित साटम

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...