नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असून आज पुसद येथील नाईकांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
मनोहरराव यांचे धाकटे चिरंजीव इंद्रनील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मनोहरराव नाईक यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मनोहरराव यांची दोन्ही मुलं ययाती व इंद्रनील यांनी अर्ज दाखल केले असून उमेदवारीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मनोहरराव यांचा कल इंद्रनीलच्या बाजूने आहे तर मनोहरराव यांच्या पत्नी नगराध्यक्षा अनिता नाईक या ययातीच्या बाजूने असल्याची चर्चा पुसदमध्ये आहे.