नागपूर : शरीराचे तुकडे तुकडे करून निर्घृण खून करण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गांधीसागर भागात उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बुधवारी सायंकाळी गांधीसागरमध्ये एक पोते तरंगताना आढळले. गणेशपेठ पोलिसांनी जगदीश खरे यांच्या मदतीने पोते तलावात बाहेर काढले. त्यात धडाचे दोन तुकडे होते. धडाला शीर व दोन्ही हात पाय नव्हते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक पोलिस आयुक्त राजरत्न बन्सोड, गणेशपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
पंचनामा करून धडाचे दोन तुकडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शवागारात पाठविले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अधिक वाचा : नागपूर – अंबाझरी भिंत धोकादायकच, कामासाठी देणार दहा कोटी !