नागपूर – अंबाझरी भिंत धोकादायकच, कामासाठी देणार दहा कोटी !

Date:

नागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाची भिंत केव्हाही दगा देऊ शकते याची मला कल्पना आहे. भक्कम संरक्षक भिंत उभारण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्यात येतील. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. अंबाझरी तलावाच्या खोलीकरण तसेच अन्य कामासाठी वन विभागाच्यावतीने दहा कोटी रुपये देण्यात येतील, अशी ग्वाही वन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

फडणवीस सरकारमधील सर्वात तरुण राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तलावाच्या भिंतीला बळकट करणे आवश्यक आहे. संरक्षण भिंत वा बांध उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने चर्चा करण्यात येईल. तसेच, स्थानिक प्रशासनाकडूनदेखील स्थिती जाणून घेण्यात येईल. महापालिकेऐवजी सिंचन विभाग वा मेट्रोने बांधकाम करावे, याचा विचार केला जाईल. मेट्रोकडे सक्षम यंत्रणा आहे. त्यांनी भिंत बांधल्यास अधिक योग्य ठरू शकते पण, कुणी भिंत बांधावी हा नंतरचा प्रश्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वृक्ष लागवडीसोबतच येणाऱ्या काळात वृक्ष संवर्धन अभियान राबवण्याचा विचार आहे. काही भागात असा प्रयोग करण्यात आला. रोपटे जोपासण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व जनजागरण आवश्यक आहे, असे सांगून डॉ. फुके म्हणाले, अंबाझरी परिसरात जैववैविधता पार्क तयार करण्यात आला आहे. येत्या पंधरवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंधरवड्यात उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘सफारी’ येत्या १५ ऑगस्टपूर्वी सुरू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. त्या दिशेने विभागाचे प्रयत्न चालले आहेत. नवेगाव-नागझिराकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अन्य व्याघ्र प्रकल्पातील ५ वाघिणी सोडण्यात येतील, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

दोन दिग्गज मंत्र्यांसोबत कामाच्या अनुभवाकडे लक्ष वेधले असता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत त्यावर भर देणार असल्याचे फुके म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता येण्याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यात आम्हाला यश येईल, असा दावा परिणय फुके यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांचा विमा

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून दर दोन-चार दिवसांत एका आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करतो व अडचणी जाणून घेतो. त्या दूर करण्याचे प्रयत्न चालले आहेत. राज्यातील साडेपाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांना विम्याचे कवच उपलब्ध करून देणार आहे. आदिवासी मुलांच्या पाचवीला पुजलेले जमिनीवर बसणे, भोजन करणे आणि झोपणे येत्या तीन महिन्यांत दूर करण्यात येईल. ‘कायापालट’ योजनेत मुलांसाठी हा बदल घडवून आणण्यात येणार असल्याचेही आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

अधिक वाचा : Nagpur : Model Mill potentially dangerous building, unfit for stay claims NMC

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...