नागपूर : रामटेक गढमंदिराच्या टेकडीचा भाग कोसळण्याची भीती

Date:

नागपूर : रामटेक गढमंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले. पण, यावेळी टेकडी परिसरात करण्यात आलेले अनेक कामे अपूर्ण स्वरुपात असल्याने मंदिर उभे असलेल्या टेकडीचा एक भाग केव्हाही कोसळू शकतो, अशी माहिती सीआयआरएसने आपल्या अहवालात दिली आहे.

रामटेक येथील ऐतिहासिक गढमंदिराच्या दुरवस्थेसंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली होती. मंदिर टेकडीवर उभे असून परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखनिजांचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला असल्याची बाब समोर आली.

त्यानंतर न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागांना जीर्णोद्धार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काम हाती घेण्यात आले. टेकडीला मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कामे करण्यात आली.

पण, काही कामे अद्याापही अपूर्ण स्वरुपात आहेत. त्यामुळे मंदिराच्या टेकडीचा एक भाग केव्हाही कोसळू शकतो, असा अहवाल सीआयआरएसने उच्च न्यायालयात सादर केला. ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल आणि नगरपरिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

अधिक वाचा : नागपूर : गुन्हेगार तडीपार असताना घरफोड्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related