नागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांगणित उत्कंठा वाढणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, कोण पीछाडीवर आहे, याबाबत क्षणोक्षणीचे अपडेट्स येथे जाणून घ्या.
Live Updates :
> ठाणे: बेलापूर मतमोजणी कक्षातील संगणक जळाल्याने मतमोजणीच्या कामास काहीसा विलंब
> लोकसभा निकाल: राज्यात युतीचे ४१ उमेदवार आघाडीवर, काँग्रेसचे ५, तर वंचित बहुजन आघाडीचा १ उमेदवार आघाडीवर
> अहमदनगर: डॉ. सुजय विखे यांची आघाडी कायम. चार फेऱ्यांनंतर ४५ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर
> भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील १ हजार ७६६ मतांनी आघाडीवर. कपिल पाटील यांना ३ हजार ६६० मते. तर महाआघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना १ हजार ८९४ मते. वंचित आघाडीचे उमेदवार प्रो. अरुण सावंत यांना ३२८ मते.
> हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पिछाडीवर. शिवसेनेच्या धैर्यधील माने यांना ८४४२ मतांची आघाडी
> कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे १५,१६५ मतांनी आघाडीवर. बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे चौथ्या फेरीअखेर २८००० मतांनी आघाडीवर
> महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. काही ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर समर्थक आतापासूनच गर्दी करू लागले आहेत.
> मावळ मतदारसंघात शिवसेनेचे बारणे आघाडीवर. राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर
> बारामतीमधून कांचन कुल आघाडीवर. सुप्रिया सुळे पिछाडीवर. अहमदनगर मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे ११ हजार ८६५ मतांनी आघाडीवर
> रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर. औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर.
> पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर. भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर.
> सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर. नागपुरातून नितीन गडकरी पुढे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत डॉ. सुजय विखे आघाडीवर
> माढामधून राष्ट्रवादीचे संजय शिंदे, साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आघाडीवर. नागपूरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरी पुढे.
> मुंबईतील सर्व सहा जागांवर भाजप-शिवसेना युतीची आघाडी, नगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर
> लोकसभा निकाल : हातकणंगलेमधून राजू शेट्टी पिछाडीवर. शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर
> नागपूरमध्ये ईव्हीएमवर आक्षेप. काँग्रेसकडून मतमोजणी थांबवण्याची मागणी.
> लोकसभा निकाल : राज्यातील पहिला कल हाती; भाजप ७ जागांवर आघाडीवर, शिवसेना २ जागांवर, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर. लोकसभा निकाल: कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर
> लोकसभा निवडणूक निकालांचे कल येण्यास सुरुवात. नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर. महाराष्ट्रात भाजपची आघाडी.
> महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह देशभरातील ५४३ जागांवरील मतमोजणीस सुरुवात. थोड्याच वेळात निकालाचा पहिला कल येणार. पहिला कल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता.
> कोल्हापूर : थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात. निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा सज्ज. उमेदवारांसह पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यात निकालाबाबत उत्सुकता
> अहमदनगर : मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू. नगर शहरातील पक्षाचे कार्यालय सजवले.
> लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील निकालांकडे सर्वांचे लक्ष. महाराष्ट्रातील जनता कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देणार याबाबत सर्वांना उत्सुकता. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार.
अधिक वाचा : Election 2019 – “Don’t Be Afraid” : Rahul Gandhi’s Message To Party On “Fake Exit Polls”