नागपूर : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह सात राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. आज संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
लाइव्ह अपडेट्स :
>> जम्मू काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघात मतदानावर बहिष्कार घालण्याची दहशतवादी संघटनांची धमकी; भीतीच्या सावटाखाली मतदान प्रक्रियेला सुरुवात
>> राजस्थानमध्ये ९ वाजेपर्यंत १३.२४ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ९.८२ टक्के, झारखंड १३.४६ टक्के, बिहार
११.५१ टक्के, जम्मू काश्मीर ०.८० टक्के, मध्य प्रदेश ११.४३ टक्के, पश्चिम बंगाल १२.९७ टक्के मतदान
>> अमेठीतील गौरीगंज भागात एका महिलेला बळजबरी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितले; स्मृति इराणी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
>> बिहारमधील छपरा मतदान केंद्रावर ईव्हीएम तोडफोडप्रकरणी रंजीत पासवान नामक व्यक्तिला अटक
>> बिहारमधील हाजीपूर मतदान केंद्राबाहेर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा
>> झारखंडमधील हजारीबाग येथे १०५ वर्षांच्या आज्जीबाईंनी बजवला मतदानाचा हक्क
>> झारखंडमधील रांची मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांची गर्दी
>> जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला
>> पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या गुंडांनी मारहाण केल्याचा भाजप उमेदवार अर्जुन सिंह यांचा आरोप
>> पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे मतदारांच्या सकाळीच मोठ्या रांगा
>> पश्चिम बंगालः बैरकपूर येथे मतदान केंद्रावर हाणामारी; टीएमसीचा भाजपवर आरोप
>> जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद
>> उत्तर प्रदेश: बसपा अध्यक्षा मायावती यांनीही बजावला मतदानाचा हक्क
>> पश्चिम बंगाल: अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड, काही मतदानकेंद्रांवर भाजप कार्यकर्ते आक्रमक
>> प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतही आज मतदान, मतदानकेंद्राबाहेर मतदारांच्या रांगा
>> राजस्थान: मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा, जयपूरमधील दृश्य
>> जम्मू-काश्मीर: पुलवामा येथेही मतदानाला सुरुवात, सुरक्षेचा चोख बंदोबस्त
>> झारखंड: हजारीबाग येथे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केलं मतदान, सिन्हा यांचे पूत्र जयंत सिन्हा लढवत आहेत निवडणूक
>> भाजपला पूर्ण बहुमत मिळणार, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आशावाद
>> केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बजावला मतदानाच हक्क
>> बिहारमधील छपरा येथे एक वृद्ध मतदार व्हीलचेअरवर मतदानकेंद्रात, बजावला मतदानाचा हक्क
>> केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी पत्नी गायत्री राठोडसह केलं मतदान
>> केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी पत्नी गायत्री राठोडसह केलं मतदान
अधिक वाचा : आफ्रिदीला मानसोपचार उपचाराची आवश्यकता : गंभीर