नागपुर : ६२ वा धम्म परिवर्तन दिवस गुरुवारी पवित्र दीक्षाभूमि येथे साजरा केला गेला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याकरिता देश-विदेशातून आलेल्या लाखो अनुयायांनी दीक्षाभूमी सजली होती. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा सायंकाळी ७ वाजेपासून सुरू झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रामुख्याने हजेरी लावली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी भारताचे संविधानातुन जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे. समता, बंधुता, स्वतंत्र अशी मूलतत्वे दिली आहे. शेवटच्या माणसाला व वंचिताला न्याय कसा द्यायचा आणि परिवर्तन कसे घडवायचे हे संविधानातून कळते. हजार वर्षापर्यंत संविधानामुळे देशातील मागासलेल्या लोकांना न्याय मिळेल. त्यामुळे भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि याच संविधानामुळे आम्ही सत्ता चलावत अहोत असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. दीक्षाभूमि येथे आयोजित मुख्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करतांना म्हटले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला मुख्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटक चे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षाभूमि परिसरात मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने चिकित्सा शिविर, रोजगार मार्गदर्शन केंद्र, कानून मशविरा केंद्र आदि प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. परिसरातील सर्वात मोठे आकर्षण इथला पुस्तक बाजार होता.
अधिक वाचा : शहरातील रावण दहनाला नितीन गडकरी सह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती