शहरातील रावण दहनाला नितीन गडकरी सह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

शहरातील रावण दहनाला नितीन गडकरी सह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

नागपुर : दसऱ्याला सायंकाळी शहरातील कस्तुरचंद पार्क येथे ६० फुटाच्या रावणाचे, तसेच कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

मागील ५० वर्षांपासून कस्तूरचंद पार्क येथे रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि हा उत्सव आता नागपूर शहराची ओळख बनला आहे.रावणाचे दहन म्हणजे वाईट प्रवृत्तीचे दहन आहे. या भावनेतून रावण दहनाचे नागपुरात आयोजन करण्यात आले होते. या रावण दहनाच्या अगोदर रामायनातील संजीवनी बूटी हनुमान लक्ष्मण करता आणतात ते दृश्य नाटका द्व्रारे दाखवण्यात आले.

रावण दहनाचा हा सोहळा बघण्यासाठी नागपूरकरांनीमोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सनातन युवक धर्म समिती तर्फे रावण दहनाच्या कार्यक्रम दरवर्षी आयोजन करण्यात येते. या उत्सवात शहरातील तसेच शहराच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. रावण दाहणाच्या सोहळ्याला काही मुल बाल हनुमान वेषभूषित सहभागी झाली होती.

अधिक वाचा : राममंदिरासाठी मोदी सरकारनं कायदा करावा! – मोहन भागवत