नागपुर :- राज्यातील नागपुरातील केमिस्ट, फार्मासिस्ट आणि औषध विक्रेते देशव्यापी संपावर गेले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून ई-फार्मसीविरोधात देशव्यापी बंद चे आवाहन ऑल इंडिया केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. यामुळे मध्य भारतातील मेडिकल हब असलेल्या नागपूरला दोन ते अडीच कोटि रुपयांचा उलाढाल चा मोठा फटका बसलेला आहे.
देशभरातील लाखो औषध विक्रेते आज एकदिवसीय संपावर गेले आहेत. त्यामुळे आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला. औषधे ही जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी शहरातील काही भागातीळ केमिस्टचे दुकाने सुरू ठेवली. परंतु, ती पुरेशी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांची दुकाने शोधण्यासाठी संपूर्ण नागपूर फिरावे लागले. तसेच नागपुरात उपचारासाठी मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडसह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील रुग्ण येतात. दरम्यान, आजच्या संपामुळे या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या आहेत, तर अनेक जन औषधि च्या शोधात शहरात फिरत असल्याचे निदर्शनात आले आहे.
Read Also : Construct Nagpur-Kanhan highway road in 6 months; HC to NHAI