नवी दिल्ली – पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेल ने 19 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. हार्दिकने पाटीदारांना ओबीसी कोट्यांतर्गत आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
हार्दिकने सकाळीच ट्वीटरवर जाहीर केले होते. नीकटवर्तीयांनी सांगितले आहे की, तुला जिवंत राहून हा लढा द्यायचा आहे. त्यामुळे मी दुपारी तीन वाजता उपोषण मागे घेणार आहे, असे हार्दिक म्हणाला होता. त्यानुसार दुपारी हार्दिकने उपोषण मागे घेतले.
किसानों एवं समाज की कुलदेवी श्री उमिया माताजी मंदिर-उंझा और श्री खोड़ल माताजी मंदिर-क़ागवड के प्रमुख लोगों ने मुझे कहा कि तुम्हें ज़िंदा रहकर लड़ाई लड़नी हैं।सब का सम्मान करते हुए अनिश्चितकालिन उपवास आंदोलन के आज उन्नीसवें दिन दोपहर तीन बजे उपवास आंदोलन ख़त्म करूँगा
— Hardik Patel (@HardikPatel_) September 12, 2018
हार्दिक पटेलच्या 19 दिवसांच्या उपोषणादरम्यान अनेक नेत्यांची हार्दिकच्या भेटी घेत त्याला पाठिंबा दर्शवला होता. उपोषणामुले हार्दिकच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे सरकारही उपोषण संपवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत होते.
सरकारने यासाठी पाटीदार नेत्यांशी चर्चाही केली होती. हार्दिकने 25 ऑगस्ट रोजी हे उपोषण सुरू केले होते. त्याची प्रमुख मागणी पाटीदारांना आरक्षण आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होती.
अधिक वाचा : राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका