आसाममधील रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) वरून देशातील राजकारण तापलेलं असतानाच एनआरसीमध्ये ज्यांच्या नावाची नोंद नाही, त्यांना देशातून हाकलून लावण्यात येईल, असं धक्कादायक विधान भाजपचे महासचिव राम माधव यांनी केलं आहे.
‘आसाममध्ये एनआरसीच्या यादीत ज्यांचे नाव नाही. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात येईल आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं जाईल’, असं राम माधव यांनी म्हटलं आहे.
‘एनआरसीमुळे बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या सर्व लोकांची ओळख पटणार आहे. पुढचं काम या लोकांचं नाव मतदार यादीतून हटवण्याचं असेल. या लोकांना सर्व लाभांपासून वंचित ठेवलं जाईल. त्यानंतर या सर्व लोकांना देशातून बाहेर काढलं जाईल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘जगातील कोणताही देश अवैध नागरिकांना खपवून घेत नाही. मात्र राजकारणामुळे भारत हा अशा लोकांची धर्मशाळा बनला आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.
अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले