पंतप्रधान मोदींचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

पंतप्रधान मोदींचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशा आणि अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट दिली आहे. लाखो आशा, अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी आज पंतप्रधानांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला. यावेळी ही घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे ही वाढ पुढील महिन्यापासूनच लागू करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनात पंतप्रधानांनी वाढीची घोषणा केली आहे. यानुसार आतापर्यंत ज्यांना 3 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 हजार 200 रुपये मिळत होते. त्यांना 3 हजार 500 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले.

अधिक वाचा : एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव